HW News Marathi
Covid-19

चिंता वाढली ! राज्यात आज डेल्टा प्लस व्हेरियंटचा पहिला बळी, आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यभर थैमान घातलं होतं. आणि आता गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. मात्र धोका पुर्णपणे टळला असं म्हणता येेणार नाही. अशातच कोरोनाचा घातक विषाणू असलेल्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यात आज (२५जूनला) पहिला बळी गेला आहे. याबाबत खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरची रहिवासी असलेल्या एका 80 वर्षाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. डेल्टा प्लस विषाणूग्रस्त महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डेल्टा प्लसने मृत्यू झालेल्या महिलेला इतरही आजार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिलेल्या माहितीला राजेश टोपे यांनी दुजोरा दिला आहे.

राज्यात सध्या डेल्टा व्हेरियंटचे २१ रुग्ण आहेत. तर आता या २१ पैकी एक रुग्ण दगावला आहे. डेल्टा व्हेरिएंट बाबतीत सध्या तरी मोठ्या प्रमाणावर रुग्ण नसल्याचं टोपे म्हणाले. जालन्यामध्ये बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. आत्तापर्यंत ३ हजार ४०० नमुन्यांपैकी २१ केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. राज्यातील ७ जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारातील २१ रुग्ण आढळून आले आहेत. हे प्रमाण ०.००५ टक्के आहे. त्यामुळे कोरोनाचा डेल्टा प्लस प्रकाराची गंभीर वाढ झाली नाही. मात्र हा काळजी करण्यासारखा विषय नसला तरी त्याचे गुणधर्म गंभीर असल्याचं टोपे यांनी जालन्यात सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

News Desk

राज्यात काही दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नका, सरकार तुमची काळजी घेईल

News Desk

राज्यात कोरोना बाधित १५९३ रुग्ण बरे होऊन घरी, एकूण रुग्ण संख्या ९९१५ वर

News Desk