HW News Marathi
Covid-19

पुण्यातील १५ हजार स्थलांतरित मजुरांची पहिली यादी तयार

पुणे | देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. यामुळे देशात लॉकडाऊनचा कालावधी वाढ करून १७ मेपर्यंत करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना घरी परतण्यासाठी केंद्र सरकाने विशेष श्रमिक रेल्वे सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून स्थलांतरित मंजुरांची यादी तयार करून त्यांना त्यांच्या घरी जाण्याची तयारी सरकार करणार आहे. परंतु पुण्यात जवळपास १५ हजारहून अधिक स्थलांतरित नागरिकांचा सामावेश आहे.

अनेक स्थलांतरित मंजुरांनी पुणे जिल्हा प्रशासनाला ई-मेलद्वारे घरी परतीचा अर्ज केला होता. या अर्जाची छाननी करून पुण्यात स्थलांतरितांची पहिली यादी तयार करण्यात आली. यात १५ हजार ५०२ परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या परप्रांतीमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारचे रहिवाशांची संख्या अधिक आहे. उत्तर प्रदेशातील जवळपास ४ हजार ०४८ आणि बिहारमधील ३ हजार ८१० नागरिकांचा या यादीत समावेश आहे. त्याच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या ५८३ नागरिकांनीही यात नोंदणी केली आहे.

पुणे हे रेड झोन असल्यामुळे अडकलेल्या नागरिकांना गावी परतण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुण्यात २ मेपर्यंत साडेपाच हजार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले होते. पुण्यातील वेगवेगळ्या भागात अडकलेल्या परप्रांतीयांना केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार नागरिकांना परवानगी देण्याची त्यांच्या नोंदणीची आणि वाहन व्यवस्था जबाबदारी पोलिसांवर देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राजीव गांधी फाऊंडेशन’ भाजपचा काँग्रेसला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न, विचारले ‘हे’ १० प्रश्न

News Desk

आसामच्या विविध भागात भूस्खलनाच्या घटना, २० जणांचा मृत्यू

News Desk

राज्यात केवळ २ दिवसांत ७०० रुग्ण कोरोनामुक्त !

News Desk