मुंबई | संपूर्ण जग हे कोरोना व्हायरसची लढत आहे. जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. यात दिलासादायक बातमी म्हणजे अमेरिकेच्या एका कंपनीने कोरोनावर लस विकसित केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या ‘मॉडर्ना’ बायोटेक्नॉलॉजीकल कंपनीने काल (१८ मे) कोरोनावर लस तयार केली असून या लसीच्या चाचणीचे प्राथमिक निकाल आशादायक असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
‘मॉडर्ना’ बायोटेक्नॉलॉजीकल कंपनीने तयार केलेली लसीचा डोस हा आतापर्यंत आठ जणांना दिला असून या लसीमुळे रुग्णांवरील रोग प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता जगात कोरोनावर पहिल लस सापडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मॉडर्ना कंपनीच्या दाव्यानुसार पहिल्यांदाच कोरोना व्हायरसची लस सुरक्षित असल्याचे दिसते. आठ निरोगी व्यक्तींना लसी देण्यात आल्या असून त्यांचे निकाल आशादायक आहेत. प्रत्येक स्वयंसेवकाला लसीचे दोन डोस दिले गेले. मार्च महिन्यात ही चाचणी सुरु झाली होती, अशी माहिती मॉडर्ना कंपनीने दिली.
Moderna released Phase I clinical trial data for a coronavirus vaccine in 8 patients. While everyone is looking for the light at the end of the tunnel, we need a dose of realism here. Phase I is to assess safety of the vaccine and tells us nothing about whether it is effective.
— Eugene Gu, MD (@eugenegu) May 18, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.