HW News Marathi
महाराष्ट्र

हुबळी रेल्वे स्थानकाच्या स्फोट, १ जण गंभीर जखमी

बेळगाव | कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट झाल्याची घटना काल (२१ ऑक्टोबर) घडली. या स्फोटात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. रेल्वे स्थानकात संशयित पार्सल कर्नाटकाच्या पोलिसांना सापडेल. या पार्सलवर कोल्हापुरातील शिवसेनेचे राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव लिहिले होते. या स्फोटात हुसेनसाबा नईवाले हा तरुण जखमी झाला आहे. स्फोटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. पोलिसांच्या शोध मोहिमेत आणखी आठ स्फोटक वस्तू आढळून आल्या आहेत.

विजयवाडा वास्को मार्गावर धावणाऱ्या अमरावती एक्स्प्रेसमध्ये रिकाम्या डब्यात रेल्वे स्थानकावरील चहा विक्रेता हुसेनसाब याला एक पार्सल आढळून आले. त्याने ते पार्सल स्टेशन मास्टर केबिनमध्ये नेले. पार्सलमध्ये लिंबूसदृश वस्तू होत्या. रेल्वे सुरक्षा रक्षकांनी पार्सल घडण्याची सूचना हुसेनसाबला दिली. मात्र, पार्सल उघडताच त्याचा स्फोट झाला. स्फोटात हुसेनसाबच्या हाताला जखम झाली तर केबिनच्या काचांचा चक्काचूर झाला. काचेचे तुकडे स्थानकावर पसरले. स्फोटाची तीव्रता कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जखमी हुसेनसाबला तातडीने किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा दाखवून दिले आता बिलोलीतही दिसेल- अतुल भातखळकर

News Desk

“उद्धव ठाकरे यांच्याकडून खुप अपेक्षा, तुमची छबी तशीच राहू द्या”, चित्रा वाघ यांची मागणी

News Desk

आरेतील मेट्रो कारशेडला विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मागे

News Desk