HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांना शिफारस केल्यानंतर; आज विधानभा अध्यक्षाची निवड होणार का?

मुंबई | राज्याचे मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीनंतर महाविकासआघाडीमधील तीन मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने काल (२६ डिसेंबर) विधानसभा अध्यक्षपद निवडीच्या कार्यक्रम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. महाविकासआघाडी सरकारने अध्यक्षाच्या निवडीच्या कार्यक्रमात केलेल्या बदलाबाबत राज्यपालांनी कायदेशीर सल्ला घेण्यास सांगितले आहे. आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. यामुळे आज (२७ डिसेंबर) विधानसभा अध्यक्षची निवड होणार की लांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. 

राज्यपालांकडे विधानसभा अध्यक्षच्या निवडीच्या अनुमती घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यपालांची भेट घेतली. विधानसभा अध्यप पद निवडीच्या कार्यक्रमाची आम्ही शिफारस राज्यपालांना दिली आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाला राज्यपालांनी अनुमती द्यावी, या विनंतीसाठी आलो असून याबाबत राज्यपालांनी अभ्यास करून माहिती घेणास आहे, असे राज्यपालांनी सांगितले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अवघ्या १८ तासात २५ किमी डांबरी रस्ता पूर्ण, लिम्का बुकमध्ये नोंद!

News Desk

…तर ‘अनिल देशमुख’ करु, ‘भुजबळ’ करु या भाजपच्या धमक्या म्हणजे गुंड, राडा प्रवृत्ती !

News Desk

ऐन निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजनांना कोरोनाची लागण

News Desk