मुंबई | देशात रक्तसंकलनामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या काळात या संकलनामध्ये बरेच अडथळे, अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात रक्ताची टंचाई देखील निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी राज्य शासन आता फेसबुकची मदत घेणार आहे. त्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. जागतिक रक्तदाता दिनाच्या दिवशीच शासनाने याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या उपक्रमाबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, “राज्यात रक्तदानाचे प्रमाण वाढावे यासाठी फेसबुकचे सहकार्य घेण्यात येईल, अशी महाराष्ट्र शासन घोषणा करीत आहे. ७१ सरकारी रक्तपेढ्या या फेसबुकच्या रक्तदान व्यासपीठावर नोंदणीकृत होतील. याद्वारे त्या ४५ दशलक्ष रक्तदात्यांपर्यंत पोहोचतील. फेसबुकने ही सेवा सुरु केल्याबद्दल धन्यवाद!”
On #WorldBloodDonorsDay , GoM is announcing collaboration with @Facebook India to increase voluntary blood donations. 71 Govt blood banks will register on FB's blood donation platform and reach out to 45 million blood donors.
Thank you Facebook for setting up this service.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.