HW News Marathi
महाराष्ट्र

Prithviraj Chavan Exclusive : फडणवीस सरकारच्या काळात एकही मोठा पायाभूत प्रकल्प पूर्ण झाला नाही !

कराड | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात एकही मोठा पायाभूत सुविधा असल्याचा प्रकल्प पूर्ण करता आला नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना भाजपवर ताशेरे ओढले. भाजप सरकारने गेल्या ५ वर्षात एकही पायाभूत सुविधा पूर्ण केला नाही. मुंबईचे कॉस्ट्रोल रोड आणि नवी मुंबई विमानतळ माझ्या काळात मी मंजूर केलेल त्यांना प्रकल्प भाजप सरकारला काही करता आले नाही, असे चव्हाण यांनी भाजप सरकारच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थिती केले आहे.

मुंबईत जी मेट्रो पळते ती मी सुरु केली होती. मुंबईची मेट्रो ३चे भूमीपूजन मो केले होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि सृद्धती महामार्गाचा एवढा मोठा जागावाजा केला, त्यांचे काही करता आले नाही. एकही पायाभूत प्रकल्प भाजप सरकारला गेल्या ५ पूर्ण करता आले नाही, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना भाजप सरकारवर हल्ला बोल केला. त्यामुळे भारत सरकारचा सार्वजनिक उद्योग राज्यात आणता आला नाही.

यामुळे राज्यात आज बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या सगळ्या बाबतीत सरकार अपयशी ठरतेय, म्हणूनच महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या युवकच्या, युवतीच्या, रोजगाराच्या आणि शेतीच्या प्रश्न लक्ष न देता, ते कलम ३७०च्या घोषणा लावतात. ही निवडणूक काश्मीरची नाही ही निवडणूक महाराष्ट्राची आहे. कृपाकरून महाराष्ट्राच्या रोजीरोटीच्या प्रश्नावर या त्यावर चर्चा करा, असे म्हणत शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी एच. डब्ल्यु.मराठीला दिलेल्या मुलाखती राज्य सरकारवर टीका केली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पार्थ तुम्ही जन्मजात लढवय्ये !, राणा जगजितसिंहांचे पुत्र मल्हार पाटलांकडून पाठराखण 

News Desk

मुंबई मनपा शिवसेनेकडेच राहील आणि नाशिकचा पुढचा महापौरही शिवसेनेचाच होईल, राऊतांचा विश्वास  

News Desk

कोरोनाचा काळ संपल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र दौरा, पंकजा मुंडेंचा एल्गार

News Desk