HW News Marathi
देश / विदेश

माजी मंत्री, शिवसेनेचे अहमदनगरमधील मोठे नेते अनिल राठोड यांचे निधन

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे आज (५ ऑगस्ट) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अनिल राठोड यांना न्युमोनियाची लागण झाल्याने ८ दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी (४ ऑगस्ट) संध्याकाळपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील होत होती. मात्र, आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

नगर शहराला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यात अनिल राठोड यांचे अत्यंत मोठे योगदान राहिले आहे. अनिल राठोड यांनी दीर्घकाळ विधानसभेत नगर शहराचे प्रतिनिधित्व केले. अनिल राठोड यांची प्रकुती ठीक नसल्याचे कळताच स्वतः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फोनवरून विचारपूस केली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सामाजिक कार्याला वाहून घेतलेले कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड !

“माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. त्यांच्या निधनाने सामाजिक कार्याला वाहून घेतलेले कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आम्ही सर्वजण त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही प्रार्थना”, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारला मोठा धक्का! OBC आरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk

नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्याविरोधात पुकारले बंड

News Desk

…नाहीतर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा !

Gauri Tilekar