HW News Marathi
महाराष्ट्र

सतेज पाटलांना धक्का, माजी आमदाराने ४ दिवसांत सोडली आघाडी

कोल्हापूर | गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत अवघ्या ४ दिवसात फूट पडली. माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी आघाडीची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सरुडकरांनी निर्णय जाहीर केला. गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत राहणार असल्याचं सरुडकरांनी स्पष्ट केलं आहे.

तर दुसरीकडे, आमदार प्रकाश आबिटकर आणि राजेश पाटीलही नाराज असल्याची माहिती आहे. राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत राहण्याबाबत ते दोघेही आज निर्णय घेणार आहेत. गोकुळ मधील विरोधकांना एकत्र आणण्याचा पालकमंत्री सतेज पाटील यांचा प्रयत्न होता. मात्र तालुका स्तरावरील राजकारण विरोधकांची मोट बांधताना आडवं येऊ लागलं आहे. या गळतीमुळे राजर्षी शाहू आघाडीत अवघ्या काही दिवसांतच अस्वस्थता पसरली आहे.

राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणाकोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कोरोना परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरापासून लांबलेली ही निवडणूक २ मेला होणार आहे. मतदान महिन्याभरानंतर होणार असलं तरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण गेल्या दोन महिन्यापूर्वीपासूनच तापायला सुरुवात झाली आहे.

गोकुळ बचाव समितीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून सत्ताधारी महाडिक गटाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या पालकमंत्री सतेज पाटील या निवडणुकीसाठी चांगलीच तयारी केली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना एकत्र आणत सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधी लाचखोर नवऱ्याची बायको,नंतर मांजरीची उपमा, महेबूब शेख यांचा चित्रा वाघांवर पुन्हा पलटवार !

News Desk

शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार येता कामा नये

News Desk

“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, प्रताप सरनाईकांच्या पत्रावर मनसेचं सूचक ट्विट

News Desk