HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

आढळराव-पाटील ठाकरे सरकारवर भडकले ! ‘या’गोष्टीचा केला तीव्र शब्दांत निषेध

पुणे | रेमडेसिविर इंजेक्शनच्या खरेदीवरून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय कल्लोळानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.या बदलीचं स्वागत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं तर भाजपने मात्र ही बदली सुडबुद्धिने केल्याचा आरोप केला.आता या बदलीवरुनच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी अभिमन्यु काळे यांच्या बदलीचा तीव्र निषेध केला आहे.

शिवाजीराव आढळराव-पाटील काय म्हणाले ?

शिवाजीराव आढळरावांनी ट्विट करत म्हटलंय की,राज्यातील रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या टंचाईचे खापर अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यावर फोडण्यात येऊन त्यांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली अतिशय चुकीची व निषेधार्थ आहे.अभिमन्यू काळे यांना मी अतिशय जवळून ओळखतो. राजकीय हितापेक्षा लोकहीत नजरेसमोर ठेऊन त्यांनी नेहमीच आपल्या पदाला योग्य न्याय दिला आहे. त्यामुळेच त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून बदलीला सामोरे जावे लागले असून हे बाब अतिशय दुर्दैवी आहे.मराठमोळ्या शेतकरी कुटुंबातील एक प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या केलेल्या तकडफडकी बदलीला माझा ठाम विरोध असून जनसेवेसाठी अखंड काम करणाऱ्या या कार्यकुशल अधिकाऱ्यास माझा जाहीर पाठिंबा आहे.

 

अभिमन्यू काळेंच्या नियुक्तीला अजित पवारांचा होता विरोध!

अभिमन्यू काळे यांची सरकराने आता बदली केली असली तरी ६ महिन्यांपूर्वी त्यांच्या नियुक्तीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध होता. त्यांच्याऐवजी अनुभवी आयपीएस आधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवावी असा त्यांचा आग्रह होता. मात्र आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीने या प्रतिनियुक्तीला ठामपणे विरोध केल्याने त्यांचा नाईलाज झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही त्यांचा आग्रह टाळू शकले नव्हते. मात्र ६ महिन्यांतच काळे यांना या पदावरून हटवावे लागले.

Related posts

बांगलादेशमध्ये हसीना यांचा चौथ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा

News Desk

…तर अनिल अंबानी हे भाजपचे मालक !

News Desk

आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, राज्यात एकूण ८ मृत्यू

News Desk