HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. यानंतर परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता हे दोन कारण देत परमबीर सिंह यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंह यांच्या नागरी सेवेच्या नियमाचे उल्लंघन केल्या अंतर्गत चौकशी केली होती. त्या व्यतिरिक्त प्रशासकीय त्रुटींसाठी राज्याच्या गृह विभागाने परमबीर यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली होती. यापूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परमबीर यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या निलंबनाची कारवाई केली जाईल, असे संकेत दिली होती.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करणार”, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna

निवडणुका नाहीत तर मग देशाचे पंतप्रधान राज्यात प्रचाराला का येतात?

News Desk

फुलेवाडा आणि सवित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाला गती द्या!: अजित पवार

News Desk