HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांची ‘ही’ ऑफर माजी पोलिस अधिकारी जुलिओ रिबेरो यांनी नाकारली

नवी दिल्ली | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले असून राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता मुंबई, गुजरात आणि पंजाब आदी राज्यांमध्ये पोलिस खात्यातील सर्वोच्च पदे भूषविलेले माजी पोलिस अधिकारी जुलिओ रिबेरो यांची नुकतीच प्रतिक्रिया आलेली आहे

काल.(२१ मार्च) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांचा तपास करण्यासाठी माजी पोलिस अधिकारी जुलिओ रिबेरो यांचे नाव सुचविले होते. यावर जुलिओ रिबेरो म्हणाले की, “जर या प्रकरणाची चौकशी किंवा तपास करण्याची ऑफर दिली, तर ही ऑफर मी स्वीकरणार नाही”, असे स्पष्टीकरण रिबेरो यांनी दिले आहे.

रिबेरो यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे स्पष्टीकरण दिले. रिबेरो पुढे म्हणाले की, “मी अशा संशयास्पद प्रकरणांना स्पर्श करू इच्छित नाही. हे प्रकरण खूपच अवघड स्थितीत आहे. तसेच या प्रकरणात पुढे काय होणार, हे मला सांगता येणार नाही. राज्यकर्त्यांसाठी हेच योग्य आहे की, त्यांनी स्वतः हे प्रकरण सोडवावे”, असे सल्लादेखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप सत्ता प्राप्त करण्यासाठी येनकेन मार्गाचा उपयोग करतेय – जयंत पाटील

News Desk

बजरंग दलाने ‘कामसूत्र’ पेटवलं! नेमकं काय कारण?

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टला होणार सुरुवात

News Desk