मुंबई । टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (cyrus mistry) यांचे अपघाती निधन झाले आहे. सायरस मिस्त्री यांच्या कारला पालघरमधील चारोटी येथे अपघात झाला. या अपघातात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कार ही अहमदाबादहून मुंबईच्या दिशने येत असताना त्याचा अपघात झाला. सायरस मिस्त्री यांची कार डिव्हायडरला आदळून हा अपघत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सायरस मिस्त्री यांनी २०१९ मध्ये टाटा समूहाची सूत्रे सांभाळली आहे.
पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, “आज दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास अहमदाबादहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर सायरस मिस्त्रीच्या कारला अपघात झाला. या कारने डिव्हायडरला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. यात सायरस मिस्त्री आणि ड्राइवर यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहे.”
Cyrus Mistry, former Chairman of Tata Sons, while travelling from Ahmedabad to Mumbai, died in a road accident after his car hit a divider. 4 people were present in the car; 2 died on spot & 2 were moved to hospital: Palghar police officials pic.twitter.com/nOlhZcKUZA
— ANI (@ANI) September 4, 2022
सायरस मिस्त्री यांचा अल्पपरिचय
उद्योगपती पल्लोनजी मिस्त्री यांचे सायरस मिस्त्री हे धाकटे सुपूत्र होते. सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईतील पारसी कुंटुंबात झाला. सायरस मिस्त्री यांचे लंडन बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. सायरस मिस्त्री यांनी लंडनच्या इंपीरियल कॉलेज यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सायरस मिस्त्रींनी शापूरजी पल्लोनजी समूहाचे मॅनेजिग डायरेक्टर पद सुद्धा त्यांनी भूषवले होते. २००६ साली ते टाटा समुहाचे सदस्य बनले असून २०१३ मध्ये वयाच्या ४३ व्या वर्षीच सायरस मिस्त्री टाटा समुहाचे अध्यक्ष बनले होते. परंतु, २०१६ मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटा समुहाच्या प्रमुख पदावरून हक्कालपट्टी केली होती. यानंतर सायरस मिस्त्री आणि टाटा समूह यांच्यातील वाद न्यायालयात पोहोचला होता. तसेच २६/११ हल्ल्यात जखमी आणि यांच्यासह मृतांना टाटा समूहाकडून मदत देण्यात सायरस मिस्त्री यांचा मोठा वाटा होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.