HW News Marathi
महाराष्ट्र

घाटकोपरमध्ये ‘टाटा कॅपिटल्सच्या’ नावाने लोन देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई । घटकोपरमधील एम.जी. रोड येथील श्रीपाळ बिल्डिंग मधील बोगस कॉल सिनेटर चालवणाऱ्या तीन पुरुष व एका महिलेला गुन्हे शाखेच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट ३ ने बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सदरचे बोगस कॉल सेंटर टाटा कॅपीटल नावाने बनावट पध्दतीने लोनचे अमिष दाखवून नागरीकांची फसवणूक करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक लिंगे यांना २८ मार्चला मिळाली. याबाबत लिंगे यांनी वरिष्ठांना कळविले आणि मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्याकरीता पोलीस पथक तयार करण्यात आले. तसेच मिळालेल्या बातमीची शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेशित वरिष्ठांकडून देण्यात आले. पोलीस पथकाने धाड टाकून आरोपींना अटक केली आहे. आरोपींडकून १० मोबाईल फोन, ४ सिमकार्ड, काही डायऱ्या आणि रोख रक्कम, असा सुमारे ८२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार घटकोरपर पश्चिमच्या एम. जी. रोडवरील श्रीपाळ बिल्डींगमध्ये बोगस कॉल सेन्टर चालवत असल्याचे चारही आरोपींनी पोलीस चवकशीत काबुल केले आहे. ‘टाटा कॅपिटल्स’ कंपनीचा कोणताही अधिकृत परवाना नसताना, कोणतेही कर्ज उपलब्ध करून न देता नागरिकांना संपर्क करुन ‘टाटा कॅपिटल्स’ या कंपनीच्या कॉलसेंटरमधून बोलत असल्याचे भासवून, त्यांना होम लोन, पर्सनल लोन मिळवून देण्याचे अमिष दाखवून वॉट्सअपवर त्यांचे कागदपत्रे मागवून घेतले जायचे. कर्ज मिळण्यासाठी विमा उतरविणे आवश्यक असल्याचे सांगून नागरिकांकडून विम्याच्या रक्कम स्विकारून त्यांना कोणतेही कर्ज न देता त्यांची फसवणुक केली जात होती.

युवराज ज्ञानू देशमुख यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून घाटकोपर पोलीस ठाण्यात आरोपींवर कलम ४१९ , ४२०, ३४ भा.दं.वि सह कलम ६६ (क), ६६ (ड) भारतीय तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट ३ यांच्याकडुन करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी पोलीस निरीक्षक सोपान काकड यांचे देखरेखीखाली पोलीस निरीक्षक ओतारी, पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक लिंगे, पोलीस उप निरीक्षक जोष्टे, पोलीस उप निरिक्षक पटेल व पोलीस पथक यांनी केली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Live Update : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

News Desk

भाजपने राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही – सचिन सावंत

News Desk

“MPSC परीक्षेाठी आंदोलन करणारे विद्यार्थी लादेन समर्थक होते का?”, पडळकरांचा सरकारला सवाल

News Desk