पुणे | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सगळीकडेच कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढतना दिसत आहेत. याच पार्श्वभूमिवर पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढवा बैठक घेतली. यात महाराष्ट्रातील लसीकरण आणि ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय सामग्रीच्या पुरवठ्याविषयी महत्त्वाची माहिती दिलीय. तसेच महाराष्ट्रातील १८ वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र दिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळणार असल्याचे संकेत पवारांनी दिले आहे. याशिवाय कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले अजित पवार ?
“देशात महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. इतके दिवस आपल्या राज्याची जी गरज होती, ती भरुन काढण्यासाठी मुख्यमंत्री, आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशीही चर्चा केली. ऑक्सिजन टँकर विमानातून नेण्याची परवानगी दिली. रिकामे टँकर विमानातून नेण्यास परवानगी दिली. भरलेले टँकर रेल्वे, बाय रोड रो रो सेवेने येतील.”
“पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचा विचार करता डिस्चार्जची संख्या वाढत आहे. बरेच पेशंट रुग्णालयांमध्ये येत आहेत. आम्ही काही निर्णय लाँग टर्मसाठीही घेतोय. 18 ते 44 वयामध्ये लसीसाठी केंद्र राज्यांवर जबाबदारी देत आहे. आम्ही ५ जणांची कमिटी बनवत आहोत. ग्लोबल टेंडर काढण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.
रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि लस मग ती सीरम असो, भारत बायोटेक असो, फायजर असो, ज्या कोणत्या असतील त्या सर्वांचा उल्लेख ग्लोबल टेंडरमध्ये असणार आहे. इंजेक्शनचा तुटवडा आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून लसीकरण सुरु करण्याची तयारी आपण केली आहे.
ऑक्सिजनबाबत जे बंद पडलेले प्लांट आहेत, ते सुरु करत आहोत. काही वीजेअभावी बंद होते, काही पैशांअभावी बंद होते. ते सुरु करत आहोत. पवारसाहेबांनी सूचना केली आहे, साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
तसेच, जामनगरचा जो कोटा आहे तो वाढवला नसला तरी कमी करु नका अशी केंद्राला विनंती केलीय.
इंजेक्शनचा तुटवडा आहे, मात्र दोन-तीन दिवसात औषध कंपन्या प्राधान्य देतील असं सांगितलं पण केंद्राने पुन्हा त्यांचा ताबा घेतला. आमची केंद्राला विनंती आहे.
तसेच, मी नितिन गडकरींशी बोललो आहे. ते म्हणाले की, विदर्भातलं ऑक्सिजन पुरवठ्याचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा, असं वेगवेगळ्या भागातलं नियोजन वाढलं तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही.
1 मे महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री मोफत लसीबाबत भूमिका काय आहे, ते सांगतील. ग्लोबल टेंडर काढू. आदर पुनावाला म्हणाले एवढी लस देऊ शकत नाही, आमची क्षमता आहे तेवढी देऊ, इतर कंपन्यांच्या लसी घेण्याबाबत त्यांनी सांगितलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.