HW News Marathi
Covid-19

कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांना १२वी पर्यंत मिळणार माेफत शिक्षण

मुंबई। गेल्या दोन वर्षांपासून कोरोना या साथीने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कित्येकांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक मुलं कोरोनामुळे अनाथ झाली आहेत. अशा अनाथ झालेल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न डोळ्याकडे उभा राहिलेला असताना आता राज्य सरकार या मुलांच्या भविष्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्चाचा भार राज्य सरकार करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला होता. या प्रस्तावाला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.

शाळा कधी सुरु होणार

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी आहेत , तेथील परिस्थिती पाहून १०-१२ वी वर्ग सुरू करण्यासंदर्भात चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. पुढील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या व भविष्यात गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावात १० वी आणि १२ वीचे वर्ग सुरू करण्याची शक्यता आहे, असंही त्या म्हणाल्या. तर

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता सरकारकडून योग्य त्या खबरदार्‍या घेण्यात येत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे येत्या काळात शाळा सुरू होणार नाहीत, असे संकेत वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड काय म्हणाल्या

वर्षा गायकवाड ट्वीट करत म्हणाल्या की, कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा १ ली ते १२ वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनातर्फे करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच आवश्यक निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!

वर्षा गायकवाड पुढे बोलतांना म्हणाल्या की, शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी राज्य सरकार कसोटीने प्रयत्न करीत आहे. काही महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या व भविष्यात गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावात दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याची शक्यता तपासण्याची परवानगी दिल्याबद्दल देखील मुख्यमंत्र्यांचे आभार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही कमी

News Desk

गुजरातमध्ये स्मशानात मृतदेहांची चेंगराचेंगरी सूरू, महाराष्ट्राने यातून धडा घ्यावाच! – सामना

News Desk

लॉकडाऊनचा कृषि उत्पन्न बाजार समित्यांवरील परिणामांसंदर्भात समिती गठीत

News Desk