HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 7 रुपयांनी महागणार; प्रतिलिटर 80 रुपये मोजावे लागणार

मुंबई | सणासुदी लगबग सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला आता सर्व सामान्य जनतेच्या जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरी दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. यानंतर मुंबईत 1 सप्टेंबरपासून आता सुटे दूध (Milk) प्रतिलिटर सात रुपयांनी महागणार आहे. यानंतर एक लिटर दुधासाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, चाऱ्यांचा खर्च वाढल्यामुळे दूधच्या किंमती वाढ झाली आहे. यामुळे दूध उत्पादकांनी सुट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू महागल्याने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसणार आहेत. दूधाचे हे नवे 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असतील.

दूधाबरोबर सर्व सामान्याचा नाश्या मानले जाणाऱ्या पोहे महागले आहे.  यात पोहे, दगडी पोहे, पातळ पोहे, भडंग आणि मुरमुऱ्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. पोहे, भडंग आणि मुरमुऱ्याच्या दरात गेल्या तीन महिन्यात पाच ते सहा रुपयांची वाढ झाली आहे. कच्चा मालाच्या तुटवड्यात दरवाढ झाल्यामुळे दिवाळीपर्यंत कायम राहणार आहे.

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ही इंग्रजांची विधानसभा आहे का?, फडणवीस आक्रमक

News Desk

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या नरेंद्र चपळगावकर यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

Aprna

तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका…किंबुहना ऐकाच!

News Desk