HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंच्या अडचणीत आणखीनच वाढ, ईडी चार्जशीट दाखल करण्याची शक्यता!

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सुमारे पावणे सहा कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्याचप्रमाणे एक बँक खाते गोठवलं. त्यात 86 लाख रुपये आहेत. मनी लाँडरिंग कायद्यानुसार ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. एकनाथ खडसेंविरोधात ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंतची ही मोठी कारवाई आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी 27 ऑगस्ट रोजी एकनाथ खडसे यांची पाच कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली.

गैरव्यवहार प्रकरणी ही चार्जशीच दाखल करण्यात येणार

त्यानंतर आता एकनाथ खडसेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. कारण, ईडी चार्जशीट दाखल करण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात ईडी चार्जशीट दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही चार्जशीच दाखल करण्यात येणार आहे.

तब्बल ९ तासाच्या चौकशीनंतर ईडी कार्यलायतून एकनाथ खडसे बाहेर

एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. तब्बल ९ तासाच्या चौकशीनंतर ईडी कार्यलायतून एकनाथ खडसे बाहेर पडले आहेत. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली. खडसेंसोबतच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. मात्र त्या उपस्थित राहिला नाहीत.

एकंदरीत प्रकरण काय आहे?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७५ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार सरकारने विकासाचं राजकारण करण्याऐवजी केवळ लोकांची दिशाभूल करण्याचंच काम केलं

News Desk

राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; संपूर्ण देशाचे लक्ष

Aprna

शरद पवारांना सरकार चालवण्याचा दांडगा अनुभव ,सामनातून राष्ट्रवादीचे कौतुक तर काॅंग्रेसवर टीका

News Desk