HW News Marathi
महाराष्ट्र

गणेश मंडळाचा उपक्रम; गणेशोत्सवात जन्मणाऱ्या मुलींना पाच हजारांची भेट

ढालगाव (जि. सांगली) – कवठेमहाकाळ येथील एका गणेश उत्सव मंडळाने यंदा अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय सामाजिक उपक्रम राबविला आहे. स्त्रीभ्रूण हत्या आणि मुलींचा घटता जन्मदर रोखण्यात हातभार लावण्यासाठी जन्माला येणाऱ्या मुलीला पाच हजारांची भेट देण्यात येणार आहे.

ढालगाव येथील श्री बालगणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सवच्या सात दिवसांत हा उपक्रम राबविला आहे. या काळातमुलगी जन्माला आल्यास तिच्या नावे पाच हजारांची ठेव ठेवण्यात येणार असून या उपक्रमाच्या पहिल्या मानकरी राणी संतोष गडदे या ठरल्या आहेत. ढालगावचे श्री बाल गणेश मंडळ हे विविध सामाजिक कार्यात भाग घेत असून समाजासाठी बांधिलकी या भावनेतून त्यांची प्रत्येक वर्षी वाटचाल सुरू आहे.

गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना या मंडळाने गेली पंधरा वर्षे पाळली आहे. यासाठी त्यांना पोलिसांनी प्रथम पुरस्कारही दिला आहे. यावर्षी मंडळाने गणेश मंडपाजवळ झाडे लावा, झाडे जगवा, मुलगी वाचवा, स्वच्छता अभियान यासारखे फलक लावून जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सात दिवस गणेश उत्सव काळात मुलगी जन्माला आल्यास मुलीच्या नावे पाच हजार रुपयांची ठेव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगणाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, भाजपने घेतला युटर्न! 

News Desk

चौकशी अधिकारी छळ करत आहेत ! रश्मी शुक्लांची उच्च न्यायालयात धाव

News Desk

कोरोनाची संख्या कमी होत असताना अशी मागणी करणं हे षडयंत्र तर नाही ना?

News Desk