HW News Marathi
महाराष्ट्र

विखे-पाटलांचे जावई कॉंग्रेसमध्ये! पिता-पुत्रही घरवापसी करणार का? 

मुंबई | राज्यात निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कार्यकर्ते, नेते एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस, राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये गेलेले नेते, पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतू लागले आहेत.नुकतेच मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक सिताराम गायकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.त्यानंतर आता राधाकृष्ण विखे-पाटील यांचे जावई गणेश माने -देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित त्यांनी प्रवेश केला.

२०१९ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश देशमुख यांची भाजपकडून लढण्याची इच्छा होती. त्यांनी तयारीही जोरदार केली होती. इतकंच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांचा मेळावाही घेतला होता. मात्र, त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली नव्हती. भाजपमध्ये योग्य संधी न मिळाल्याने आता त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत नव्या इनिंगला सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये औपचारिक प्रवेश केला.दुसरीकडे राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे या पिता-पुत्रांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच कॉंग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता.त्यामुळे आता जावयाच्या पक्षांतरानंतर विखे पिता-पुत्र घरवापसी करणार का ? अशा चर्चा रंगल्या आहेत.

गणेश माने कोण आहेत ?

गणेश माने हे राधाकृष्ण विखे -पाटील यांचे जावई आहेत.गणेश माने देशमुख हे ‘जयहिंद शुगर्स’चे अध्यक्ष असून सहकार क्षेत्रात ते कार्यरत आहेत. दुष्काळी भागातील जनतेला व शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठीही ते प्रयत्नशील असतात. सेंद्रिय शेतीवरही ते काम करतात. तरुण तडफदार नेतृत्व असलेल्या गणेश माने देशमुख यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला बळकटी मिळेल, असा विश्वास कॉंग्रेसला आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळं येत्या काळात अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

Aprna

कोरोनावाढीचा ठपका महाराष्ट्रावर ठेवण्याऐवजी हे पाप कोणाचे याचे आत्मपरीक्षण फडणवीसांनी करावे!

News Desk

देशातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय – जयंत पाटील

News Desk