मुंबईत अनेक ठिकाणी गॅस गळतीच्या नागरिकांच्या तक्रारी
मुंबई | मुंबईतील काही भागांमध्ये काल (६ जून) रात्री दुर्गंधी पसरल्यामुळे अनेक नागरिकांनी सरकारी यंत्रणांकडे फोन करुन चौकशी केल्याची माहिती मुंबई महानगपालिकेने दिली आहे. घाटकोपर, पवई, चेंबुर, विक्रोळीसारख्या भागांमधून अनेक नागरिकांनी गॅसचा वास येत असल्याची तक्रार केल्याचे महापालिकेने ट्विटरवरुन सांगितले आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून नक्की हा वास कशामुळे येत आहे याचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचेही ट्विटरवरुन स्पष्ट करण्यात आले आहे.
With regards to the foul odour across some parts of Mumbai, as of now the Mumbai Fire Brigade has been activated with its SoPs. I appeal to all to stay indoors, not panic. Close your windows. @mybmc is actively monitoring this situation https://t.co/jOLvZdCfJW
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 6, 2020
मात्र, मुंबई महानरपालिकेने याबद्दलची माहिती देण्याआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून माहिती दिली होती. चेंबूर आणि चांदीवली भागांमधून आम्हाला काही जणांनी ट्विटवरुन दुर्गंधीसंदर्भात तक्रारी केल्या आहेत. मुंबई महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून यासंदर्भात शोध घेतला जात आहे. नियोजनासाठी प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार (एसओपी) काम हाती घेण्यात आले असून काहीही माहिती असल्यास ती कळवली जाईल,” असे त्यांनी यांनी ट्विटमध्ये लिहिले होते. आणि मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन देखील केले. घरातच थांबा, खिडक्या बंद करुन घ्या असेही त्यांनी सांगितले.
सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून आवश्यक ती सर्व संसाधने उपलब्ध करण्यात आली आहेत. या वासाचा उगम शोधण्यात येत असून एकूण १७ अग्निशमन संयंत्रे तैनात आहेत. सार्वजनिक उद्घोषणा करण्यासह गरज भासल्यास प्रतिसाद देणारी कृती करण्यास यंत्रणा सज्ज आहे. तसेच, आदित्य ठाकरे यांनीही परिस्थीती आता नियंत्रणात आल्याचे ट्विट केले आहे.
कृपया घाबरून जाऊ नये. खबरदारीचा उपाय म्हणून परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी अग्निशमन दलाकडून १३ संयंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. सदर वासामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कृपया ओला रुमाल किंवा कपडा नाकाभोवती गुंडाळावा. #BMCUpdates pic.twitter.com/b6MhWnUqpt
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 6, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.