मुंबई | पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जम्मू-कश्मीरमध्ये परिस्थतीसाठी भारत जबाबदार धरले होते, असे वादग्रस्त ट्विट केले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर यांनी आफ्रिदीच्या ट्विटकरुन चोख प्रत्युत्तर दिले.
“भारतव्याप्त कश्मीरची परिस्थती अस्वस्थ करणारी आणि चिंताजनक आहे. आत्मसन्मान आणि स्वातंत्र्यासाठी आवाज उठवणाऱ्या निष्पापांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. संयुक्त राष्ट्र आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटना कुठे आहेत? या संघटना हा रक्तपात थांबवण्यासाठी ते कोणतेच पावले उचलत नाहीत?” शाहिद आफ्रिदी याने असे वादग्रस्त ट्विट केले.
Appalling and worrisome situation ongoing in the Indian Occupied Kashmir.Innocents being shot down by oppressive regime to clamp voice of self determination & independence. Wonder where is the @UN & other int bodies & why aren't they making efforts to stop this bloodshed?
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) April 3, 2018
या ट्विट केल्यानंतर पुन्हा एकदा ट्विट करुन भारतीय तिरंग्यासोबत फोटो टाकला. “आम्ही प्रत्येक सन्मान करतो. हा फोटा खऱ्या खेळाडूचे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा मानवाधिकाराचा मुद्दा येतो. तेव्हा तो आमच्या निरागस काश्मीरीयांनाही लागू व्हावा” असे ट्विट शाहीद आफ्रिदी यांने केले होते.
We respect all. And this is an example as sportsman. But when it comes to human rights we expect the same for our innocent Kashmiris. pic.twitter.com/DT5aF1wX8P
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) April 3, 2018
आफ्रिदीच्या ट्विटनंतर वादाला तोंड फूटले. त्यानंतर ट्विटरवर आफ्रिदीला नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर याला काही पत्रकारांनी फोन करुन आफ्रिदीच्या विधाना बदल विचारणा केली.
Media called me for reaction on @SAfridiOfficial tweet on OUR Kashmir & @UN. What’s there to say? Afridi is only looking for @UN which in his retarded dictionary means “UNDER NINTEEN” his age bracket. Media can relax, @SAfridiOfficial is celebrating a dismissal off a no- ball!!!
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 3, 2018
“मला काही पत्रकारांनी फोन करुन आफ्रिदीच्या कश्मीर आणि यूएन बदल केलेल्या विधाना संदर्भात विचारणा केली. पण, त्याच्याबदल बोलण्यासारखे काय आहे? आफ्रिदीला यूएन यांचा अर्थ सुद्धा माहिती नसेल. आफ्रिदीला वाटले असेल की, यूएन म्हणजे ‘अंडर नाईन्टिन’ आहे. यांच्या पलिकडे त्याला काहीच माहिती नाही. माध्यमांनी त्याला फार सीरियस घेऊ नये, तो नो बॉलवर विकेट साजरी करतोय,” अशा शब्दात गौतम गंभीर यांनी ट्विटरवरुन आफ्रिदीवर टीका केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.