HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

खडसेंच्या जाण्याने पक्षाला खिंडार पडणार नाही –  गिरीश महाजन

मुंबई | एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपकडून अशी प्रतिक्रिया आली की एका कोणाच्या जाण्याने पक्ष थांबत नाही. तर कुणी म्हटलं जिथे आहात तिथे सुखी राहा. यावरुन आता भाजप आमदार गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप हा विचारधारेवर चालणारा पक्ष असून कुणी पक्षातून गेल्याचा काहीही परिणाम होणार नाही. एकनाथ खडसे यांच्या जाण्याने पक्षाला खिंडार पडणार नाही. खडसेंसोबत कुणीही जाणार नसल्याचा भाजप आमदार गिरीश महाजन यांनी केला. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या कोअर समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आज पहिल्यांदाच भाजपच्या कोअर समितीची बैठक घेण्यात आली. पक्षाचे संघटन मंत्री विजय पुराणीक व आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. भाजपची आजची बैठक ही नियमीत प्रकारातील असून कार्यकारिणीची निवड करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.  तसेच एकनाथ खडसेंच्या जाण्याने कोणतीही खिंडार पडणार नसून त्यांच्या सोबत कुणीही जाणार नसल्याचे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, आजच्या कोअर समितीच्या बैठकीला खासदार रक्षा खडसे यांनी अनुपस्थिती दर्शविल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, रक्षा खडसे दिल्ली येथे महत्वाची बैठक असल्याने गैरहजर आहेत. त्यांनी याबाबत आधीच अधिकृत परवानगी घेतलेली आहे. दोन दिवसानंतर त्या पक्षाच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एकनाथ खडसेंसोबत अनेक आमदार देखील भाजप सोडणार आणि राष्ट्रवादीत जाणार असे म्हटले जात होते. त्यावरुन महाजन यांनी कोणीही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Related posts

वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष

News Desk

साध्या वेषात मोहीम फत्ते !

News Desk

अयोध्या वारीसाठी सेनेला मनसे शुभेच्छा !

News Desk