HW News Marathi
महाराष्ट्र

वृक्ष लागवड योजनेच्या यशासाठी १८ महिन्यांची रोपं द्या – सरपंच संघटनेची मागणी   

उत्तम बाबळे

नांदेड – राज्य शासनाचं २०१७ वर्षासाठीचं ४ कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आहे. त्यामुळं २ ते ५ महिने वयाची रोपटी पुरविली जात आहेत. ते जगण्याची शाश्वती नसल्यानं या योजनेच्या यशस्वीततेसाठी किमान १८ महिने वयोमानावरील योग्य वाढ झालेली रोपटे ग्राम पंचायतींना पुरवावीत अशी मागणी भोकर तालुका ग्राम पंचायत संघटनेनी केली आहे.

प्रतिवर्षी राज्य शासन वृक्ष लागवडचे उद्दीष्ट ठरविते व ही मोहिम राबविली जाते. ही मोहिम राबविली हे दर्शविण्यासाठी लोकप्रतिनिधी,अधिकारी,कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या हाैसेने रोपटे लावतात व लावतांनाचे फोटो काढून एेन केन मार्गाने प्रसिद्धी देतात.परंतू लावलेले ते वृक्ष रोपटे चांगल्या प्रतीचे व योग्य वयोमानाचे आहे का ? हे पाहत नसतात.परिणामी कमी वयोमानाचे ते रोपटे बहुतांश जगत नाहीत.यामुळे शासनाने राबविलेल्या मोहिमेची उद्दीष्टपुर्ती होते परंतू उद्दीष्ट यशस्वीतता होत नाही.याच अनुशंगाने यावर्षी देखील NRGS योजने अंतर्गत ग्राम पंचायतींना वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले आहे.त्यासाठी राज्यातील काही ठराविक रोपवाटीकेतून रोपे पुरविली जात आहेत.ती रोपटे २ ते ५ महिने वयोमानाची व चांगली वाढ झाली नसल्याचे निदर्शनास येत आहेत.

शासनाच्या आदेशाप्रमाणे ही रोपटे किमान १८ महिने वयोमानावरील व किमान २ ते ६ फुट उंचीचे असायला पाहिजेत.तसे रोपटे पुरविले जात नाहीत.ते जगण्याची शास्वती नसते. गेल्या वर्षी देखील असेच कमी वयाचे रोपटे पुरविली गेली.परिणामी ही योजना अशस्वी झाली. ही योजना केवळ उद्दीष्टपुर्तीसाठी नव्हे तर यशस्वीततेसाठी राबविली जावी यासाठी भोकर तालुका सरपंच संघटनने किमान १८ महिने वयोमानाची व २ ते ६ फुट उंच योग्य वाढ झालेली वृक्ष रोपटे पुरवावीत अशी मागणी एका निवेदनाद्वारे भोकर उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे यांच्या मार्फत संबंधीतांकडे दि.२७ जून २०१७ रोजी केली असून तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना ही निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.ही योजना फलदायी व्हावी यासाठी संसंधीतांना त्वरीत आदेशीत करावे असे ही त्यात नमुद करण्यात आले असून या निवेदनावर सरपंच संघटना अध्यक्ष सुनिल चव्हाण,सचिव मुक्ताबाई गायकवाड,किशोर पाटील लगळूदकर,रावसाहेब जाधव,लक्ष्मण पपुलवार,साै.सुवर्णा गणेशराव देवकर यासह आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

१८ महिने वयोमानाची वृक्ष रोपटे पुरविण्यास कृषि तंत्रनिकेतन विद्यालय,भोकर ची तयारी….

राज्यातील रोपवाटीकेत योग्य वयोमानाची व परिपुर्ण वाढ झालेली रोपटे उपलब्ध नसतील तर श्री सत्यदेव नर्सरी,राज मंडरी,आंध्रप्रदेश येथून १८ महिने वयोमानावरीव व योग्य वाढ झालेली रोपटे आम्ही पुरवठा करु अशी हमी कृषि तंत्रनिकेतन विद्यालय ,भोकर ने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘गोसीखुर्द’च्या पाण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

Aprna

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ

News Desk

पुण्यात २ कोरोनाबाधितांचा मृत्यू, पुण्यातील मृतांचा आकडा ३२ वर

News Desk