HW News Marathi
महाराष्ट्र

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना पत्राद्वारे विनंती

मुंबई |मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत,” अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

या पत्रा मुख्यमंत्री म्हणाले की, “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे १६ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला.तर तर अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पूर्ण करते. मात्र अभिजात भाषेचा दर्जा मिळणेबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.”

तसेच “संबंधित विभागाने सादर प्रकरण साहित्य अकादमीच्या भाषा समितीकडे विचारार्थ असल्याचे कळविले आहे. बराच कालावधीपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून मराठीला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मोहटा देवस्थानला माहिती अधिकार लागू

News Desk

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारकडून दिलासा, घेतले महत्वाचे ‘हे’ निर्णय

News Desk

फडणवीसांनी ‘या’ कारणासाठी शरद पवारांची भेट घेतली, राष्ट्रवादीने दिले स्पष्टीकरण

News Desk