गोवा | महाराष्ट्रातील सगळ्यांचे आवडते पर्यटन स्थळ म्हणजे गोवा. कोरोनामुळे गोव्यातील पर्यटनावर बंदी घालण्यात आली. लॉकडाऊनमूळे गोवा कोरोनामुक्त झाला. मात्र, पुन्हा एकदा वाहतूक आणि लोकांचा प्रवास सुरू झाल्याने पुन्हा कोरोना रुग्ण गोव्यात आढळून आले. अखेर आता पुन्हा एकदा गोव्यातील पर्यटनाचे दरवाजे उद्यापासून (२ जुलै) खुले होत आहेत. गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी ही माहिती दिली.
एकदा कोरोनामुक्त होऊनही पुन्हा कोरोनाविरूद्ध लढा देणाऱ्या गोव्याने पर्यटन सुरू करण्याचे निश्चित केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी याबाबत माहिती दिली. राज्य सरकारने जारी केलेल्या एसओपी प्रमाणे चालू शकणाऱ्या २५० हॉटेल्सला पर्यटन विभागाने परवानगी दिली आहे.
“सध्या देशातील पर्यटकांना गोव्यातील पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशातील पर्यटकांना परवानगी देण्यात आलेली नाही. देशातील पर्यटकांसाठी नियमावालीही निश्चित करण्यात आली आहे. गोव्यात येण्यापूर्वी पर्यटकांना त्यांचे हॉटेलचे बुकिंग आधीच करावे लागणार आहे. त्यानंतर ते पर्यटन विभागाकडे परवानगीसाठी येईल.
तसेच, पर्यटकांना गोव्यात दाखल होताना कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे, किंवा प्रमाणपत्र नसल्यास अशा पर्यटकांची चाचणी सीमेवरच करण्यात येणार आहे. त्यानंतर चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत राज्य सरकारच्या क्वारंटाईन भागात त्यांना ठेवण्यात येणार आहे.
Goa to open for tourists from tomorrow as 250 hotels were granted permission to resume operations. For a tourist to enter Goa, he/she will have to carry a #COVID19 negative certificate within stipulated 48-hrs window or get mandatorily tested in Goa: M Ajgaonkar, Tourism Minister pic.twitter.com/HTio1NVj5v
— ANI (@ANI) July 1, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.