HW News Marathi
Covid-19

राज्यातील २ रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा चांगला परिणाम !

मुंबई | “आयसीएमआरकडून प्लाझ्मा थेरपीबाबत आज (२८ एप्रिल) नेमक्या काय सूचना करण्यात आल्या ते अद्याप मी ऐकले नाही. पण मी हे सांगू इच्छितो कि, आयसीएमआरने आम्हाला परवानगी दिल्यानंतर आम्ही राज्यात प्लाझ्मा थेरपी प्रायोगिक तत्त्वावरच करत आहोत. त्याचप्रमाणे, राज्यातील २ रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा चांगला परिणाम देखील दिसून आला आहे”, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी यांनी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आज (२८ एप्रिल) झालेल्या पत्रकार परिषदेत प्लाझ्मा थेरपीच्या कोरोना रुग्णांवरील वापराबाबत काही सूचना करण्यात आल्या आहे. यावेळी, “प्लास्मा थेरपीबाबत अद्याप संशोधन सुरू असल्याने मार्गदर्शक सुचनांनुसारच या थेरपीचा वापर व्हावा. अन्यथा संबंधित रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो”, असा इशारा केंद्राकडून देण्यात आला आहे.

“प्लास्मा थेरपीबाबत अद्याप संशोधन सुरू आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर प्लास्मा थेरपीचा वापर व्हावा. कोरोनाच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असल्याचा कोणताही पुरावा आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे, मार्गदर्शक सुचनांनुसारच प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जावा. अन्यथा संबंधित रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो”, असा इशारा आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. राज्यातील २ कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा चांगला परिणाम दिसून आल्याची माहिती देखील यावेळी राजेश टोपे यांनी याबाबत बोलताना दिली आहे. विशेषतः कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी प्लास्मा थेरपी प्रामुख्याने वापरली जाते. मात्र, अद्याप त्याचा फायदा खरंच होतो का ? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हा इशारा देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सीरमला भेट देत घटनास्थळाची पाहणी करणार

News Desk

अमोल कोल्हेंनी रेमेडेसिविर मिळत नसल्यास सांगितली पर्यायी औषधाची नावे!

News Desk

शरद पवार आज दिवसभर अन्नत्याग करणार !

News Desk