HW Marathi
महाराष्ट्र मुंबई

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! महापोर्टलच्या परीक्षा घेण्यास MPSC तयार

पुणे | राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सरकारच्या विविध विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या गट ब आणि गट क च्या पदांसाठी परीक्षांचं आयोजन करण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र, लोकसेवा आयोगानं राज्य सरकारपुढे या संदर्भात काही मुद्दे मांडले आहेत.

महापोर्टल म्हणजेच महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या गट ब आणि गट क, ड च्या परीक्षा एमपीएससीतर्फे घेण्यात याव्यात, अशी मागणी हजारो विद्यार्थी करत होते. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारनं लोकसेवा आयोगाकडे याबाबत पत्राद्वारे विचारणा केली होती. त्यानुसार लोकसेवा आयोगानं राज्य सरकारला पत्राद्वारे त्यांची भूमिका कळवली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या 18 जून 2020 च्या पत्राला उत्तर देताना आयोगानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काही अटींवर सर्व शासकीय कार्यलयातील गट ब तसेच गट क संवर्गातील पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यामधील प्रमुख बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सूट) विनियम 1965 मध्ये आवश्यक ते बदल करणे.

सर्व शासकीय विभागांच्या सर्व संवर्गांचे सेवा प्रवेश नियम आयोगाच्या सहमतीनं सुधारित करणे, लोकसेवा आयोगाकडील मनुष्यबळ वाढवणे, यासह इतर अटींवर लोकसेवा आयोग परीक्षा घेण्यास तयार असल्याचं सरकारला कळवण्यात आलं आहे.

आता राज्य सरकार काय घेणार निर्णय ?

राज्य सरकारने पत्र लिहून एमपीएससीला गट ब, गट क आणि ड संवर्गातील पदांच्या भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्याबाबत अभिप्राय मागवला होता. यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यांची भूमिका सरकारला कळवली आहे. त्यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.

Related posts

उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल, सेनेचा योगींना सल्ला

News Desk

अंडरवर्ल्ड डॉनच्या मुलाचा मृतदेह रेल्वेरुळावर

News Desk

पंढरपूर आंदोलन प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

News Desk