HW News Marathi
Covid-19

मुंबईसाठी आनंदाची बातमी …..

मुंबई | मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १ हजार ८६० दिवसांवर पोहोचला असून कोविड दरवाढीचा दर (७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट) हा ०.०४ टक्के इतका आहे. याबरोबरच बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या सक्रिय रुग्ण, म्हणजेच ज्यांवर उपचार सुरू आहेत अशा रुग्णांची संख्या २ हजार ८७९ इतकी आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट करत आनंदाची बातमी दिली आहे. शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ९. ५२ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. तर, १. ५१ लाख मुंबईकरांचे लसीकरण झाले. व आजघडीला मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच, तरीही मास्क वापरा, लस घ्या आणि सुरक्षित राहा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत दिली आनंदाची बातमी

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट करत आनंदाची बातमी दिली आहे. शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ९. ५२ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. तर, १. ५१ लाख मुंबईकरांचे लसीकरण झाले. व आजघडीला मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच, तरीही मास्क वापरा, लस घ्या आणि सुरक्षित राहा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मुंबईला मोठा तडाखा बसला होता. दुसऱ्या लाटेत एकट्या मुंबईची करोना रुग्णांची संख्येत वाढ होऊन आकडा १० हजारांपर्यंत पोहोचला होता. मात्र, कठोर निर्बंध आणि पालिकेचं नियोजनामुळं आता मुंबईतील करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे.

राज्यात डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असताना एकीकडे मुंबईतील प्रकृतीत सुधारणा होत आहे. मुंबईतील करोना संसर्ग नियंत्रणात येत आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्यानुसार रविवारपासून सामान्य मुंबईकरांना लोकलने प्रवास करता येईल. मात्र, त्यासाठी संबंधित व्यक्तीने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असावेत, अशी अट घालण्यात आली आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील. सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वारंवार आणि विनाकारण केंद्राकडे बोट दाखविणे योग्य नाही !

News Desk

राजभवनातील हवा-पाणी गढूळ होणार नाही, आम्हाला खात्री !

News Desk

देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याचं नेतृत्व सोपवण्याच्या भाजपच्या मागणीवर नितीन गडकरी म्हणतात…

News Desk