HW News Marathi
महाराष्ट्र

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, कोरोना बाधितांची रुग्ण संख्या शंभरीच्या खाली!

पुणे। गेल्या 24 तासांत पुणे शहरात नव्याने कोरोनाबाधित आढळलेल्यांची संख्या 100 च्या खाली आली आहे. आज नव्याने 97 कोरोनाबाधितांची नोंद पुणे शहरात झाली आहे. तर 233 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासांत 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात सध्या 1936 कोरोनाबाधितांवर खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये 205 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत पुणे शहरात कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांची संख्या 491959 एवढी झाली आहे तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 481133 झाली आहे. पुणे शहरात आतापर्यंत 8890 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.गेल्या 24 तासांत पुण्यात 5,778 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यासोबतच आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा हा 3068021 वर गेला आहे.

सध्या तरी काळजी करण्याची गरज नाही

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चर्चेवर भाष्य केलं आहे. नीती आयोगाने कोरोनाची जी तिसरी लाट येणार असल्याचे म्हटले होते. नीती आयोगाच्या पत्राची राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नीती आयोगाचे जून महिन्यातील पत्र असून त्यावरुन सध्या चर्चा सुरु असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. आपल्याला सध्या तरी काळजी करण्याची गरज नाही. तरी, पण आपण तिसऱ्या लाटेचा अंदाज घेत आहोत. राज्य शासन तिसरी लाट आली तरी तयार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते आज जालन्यात बोलत होते.

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राजेश टोपे यांचे कौतुक

राज्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला तोंड देताना राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला होता. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भूमिका अत्यंत महत्वाची मानली गेली. कोरोना संकटाच्या काळात राजेश टोपे यांच्या आई गंभीर आजारी होत्या. अशावेळी आईच्या आरोग्याची काळजी घेत टोपे सातत्यानं कामात व्यस्त होते. याच दरम्यान त्यांच्या आईचा मृत्यू झाला. मात्र, खचून न जाता टोपे यांनी आपली भूमिका सार्थपणे निभावली आहे. टोपे यांच्या कामाचं कौतुक विरोधी पक्षातील नेत्यांनीही केलं आहे. त्याचबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही टोपे यांना चांगल्या कामाचं प्रशस्तीपत्र दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही वारसदार आणि तुम्हीच…”, पडळकरांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं

News Desk

परमबीर सिंह यांचं वेतन रोखलं; राज्य सरकारची कारवाई करण्यास सुरुवात

News Desk

“परीक्षेला जाताना जसं लहान मुलांच्या पोटात दुखतं तसं महाविकास आघाडीचं झालंय”

News Desk