HW Marathi
महाराष्ट्र

क्रीडा, कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

मुंबई । राज्यात ओपन एसएससी बोर्ड सुरु करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीकेली आहे. १० जानेवारीला ओपन एसएससी बोर्ड सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. कलाकार, खेळाडू यांना आपल्याला हव्या त्या क्षेत्रात करीयर करता यावे, यासाठी सरकारकडून एक अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एसएससीची परीक्षा देण्यासाठी शाळेत हजर राहणे बंधनकारक होते. त्यानंतरच ते बोर्डाची परीक्षा देऊ शकत होते. कला आणि क्रीडा क्षेत्रात काहीतरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या मुलांना अभ्यासक्रमासोबत आवडीच्या क्षेत्रात काम जाणे कठीण होते. यामुळे दोन्हीकडे मुलांचे नुकसान होण्याची शक्यता असते. ओपन एसएससी बोर्डाच्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विनोद तावडे म्हणाले कि, या ओपन बोर्डला सामान्य एसएससी बोर्डप्रमाणेच दर्जा असेल. या बोर्डाची परीक्षा डिसेंबर आणि जूनमध्ये घेण्यात येणार आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. तसेच दिव्यांगांना नियमितपणे शाळेत हजर राहणे अनेकदा अवघड असते. त्यांनाही या बोर्डअंतर्गत दहावीची परीक्षा देता येणार आहे. यामध्ये पाचवीपासून प्रवेश दिला जाणार असून दहावीपर्यंत विद्यार्थी याअंतर्गत बाहेरुन परीक्षा देऊ शकतात अशी माहितीही त्यांनी दिली. या बोर्डाचे कामकाज लवकरच सुरु होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Related posts

अखिलेश यादव 4 फेब्रुवारीला मुंबई दौ-यावर

News Desk

डिजिटल उपक्रमांना चालना मिळणार दूरसंचार पायाभूत सुविधा निर्मिती धोरणास मान्यता

News Desk

#PulwamaAttack : ‘अमर रहे’च्या घोषणांनी, बुलडाण्यातील दोन्ही शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

News Desk