HW News Marathi
Covid-19

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची लागण

सांगली | सांगलील जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. अशात आणखी एका लोकप्रतिनिधीला कोरोनाची लागण झाली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यांची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. मुंबईत अधिवेशनासाठी गेले आहेत. तेथे पोहोचल्यानंतर त्यांचा अहवाल आज ‘पॉझिटीव्ह’ आला. त्यांना कोणताही त्रास नसून प्रकृती ठीक असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, तासगाव चे आमदार सुमनताई पाटील, खानापूरचे आमदार अनिल बाबर, जतचे आमदार विक्रम सावंत, विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आणि मोहनराव कदम यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी सदाभाऊ खोत आणि मोहनराव कदम हे कोरोना मुक्त होऊन पुन्हा एकदा कामाला लागले असून अन्य आमदारांच्या वर सध्या उपचार सुरू आहेत.मात्र सर्व आमदार बैठकांना एकत्र असतातच त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांची काळजी आता वाढली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रात लॉकडाऊन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल”, राष्ट्रवादीचं मत

News Desk

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची प्रकृती स्थिर! सोशल मीडियावर निधनाच्या बातम्या खोट्या…

News Desk

लॉकडाऊनवर उदयनराजे भडकले ! दिल्ली चालू मग सातारा का बंद?

News Desk