HW News Marathi
महाराष्ट्र

“मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका”, पडळकरांचं थोरातांच्या मुलीला प्रत्युत्तर

सोलापुर। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्येला आता प्रत्युत्तर दिले “काही घराणे अतिसुसंस्कृत आहेत. मी शिक्षकाचा मुलगा आहे. त्यामुळे मला सुसंस्कृतपणा माहिती आहे. तुमच्या विरोधात बोललं की असंस्कृतपणा दिसतो. मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका, असा हल्लाबोल पडळकरांनी शरयु देशमुख यांच्यावर सोलापुरात करताना हा हल्लाबोल केलाय. हे ट्विटर वार एकमेकांविरोधात चांगलच रंगलेलं पहायला मिळत.

पडळकरांनी ट्विट करून बाळासाहेब थोरात यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. म्हणून या टीकेला बाळासाहेब थोरात यांची लेक शरयू देशमुख यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यांच्या भाषेवरुन त्यांच्या संस्काराची ओळख होते, असं म्हणत वडिलांवरच्या टीकेला शरयू देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

काय आहे प्रकरण ?

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून भाजप आक्रमक झाला असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने संपुर्ण सुत्र जर आमच्या हाती दिले तर चार ते पाच महिन्यांत ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देऊ जर तसे केले नाही तर राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य केलं होतं.

त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगत टोला लगावला. त्यामुळे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थोरातांवर टीका केली. मात्र, पडळकर यांनी वापरलेली भाषा न रुचल्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांनी पडळकरांना संस्कार शिकवले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

वानखेडेंविरोधात आरोप कोर्टात करा, ट्विटरवर का करता? क्रांती रेडकरचे मलिकांना प्रतिउत्तर

News Desk

हिजाबवरुन झालेली घटना दुर्दैवी; धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे – अजित पवार

News Desk