HW News Marathi
महाराष्ट्र

धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करावी, पडळकरांची सरकारकडे मागणी

नाशिक | राज्य सरकारने त्यांच्या अधिकारात धनगर समाजाच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करावी. राज्य सरकारनं त्याची माहिती केंद्राला कळवावी. केंद्राने २०२१ च्या जनगणेनत धनगर समाजाची लोकसंख्या मोजावी, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. नाशिक येथे काल (११ ऑक्टोबर) पत्रकारांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षण, कृषी कायदे, मुख्यमंत्र्यांचा जनेतशी संवाद, मराठा आरक्षण यावर संवाद साधला.

राज्यात मराठवाडा, खानदेश,विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मेंढपाळ आहेत. त्यांच्यावर हल्ले होतात. मेंढपाळांच्या संरक्षणासाठी अ‌ॅट्रोसिटीच्या धर्तीवर कायदा तयार करावा. मेंढपाळांकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघावे. हा मोठा व्यवसाय आहे. राज्य सरकार साखर कारखान्यांना कर्ज देतं त्याप्रमाणेच जिल्हा मध्यवर्ती बँकांनी मेंढपाळ व्यवसायिकांना १० लाख कर्ज द्यावं, अशी मागणी पडळकरांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोकणात चक्रीवादळानं झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे. निसर्ग चक्रीवादळाला महिने उलटून गेले, गावं अडचणीत होती. घरावरील पत्रे उडाले, शाळांचं नुकसान झालं. सरकारनं अद्याप मदत पोहोचवली नाही. भाजपनं चक्रीवादळ ग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली. तेथील शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. सरकारला उशिरा सुचलं असल तरी त्यांनी लवकर मदत करावी, असं पडळकर म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या भेटीनंतर खडसे आज उद्धव ठाकरेंना भेटणार

News Desk

२०१९ ला परळीसहीत बीडचे सर्व मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या – अजित पवार

swarit

खडसे यांना अडकवण्यासाठी भाजपच्याच नेत्याने सुपारी दिली होती

News Desk