HW News Marathi
महाराष्ट्र

महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध, प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक उभारणार !

मुंबई | महाविकासाआघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (६ मार्च) सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यात “महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक उभारणार. तसेच प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाची कार्यालये स्थापणार. २ हजार ११० कोटींचा निधी महिला व बालकल्याण विभागाला देण्यात येणार आहे” असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तसेच महिला अत्याचारांच्या तपासासाठी विशेष तपास पथक करण्यात येणार आहेत. पुण्यात मागासवर्गीय महिलांसाठी आणि नोकरदार मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त तृतीय पंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याणासाठी मंडळ स्थापन करण्यासाठी ५ कोटी निधी प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच सामाजिक न्याय विभागासाठी ९ हजार ६६८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे अर्थंमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, दररोज रोज १ लाख शिवभोजन थाळी देण्याचा सरकारचा मानस आहे. शिवभोजन थाळी केंद्रांवर ५०० थाळी देणार आहेत. शिवभोजन थाळीसाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना स्पष्ट दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोकूळचा हा विजय जिल्ह्यातल्या सर्वसामान्य दूध उत्पादकांचा ! सतेज पाटलांनी मानले आभार

News Desk

तुमचं ऑफिस तुमची जबाबदारी, वीज बिलावरून मनसे आक्रमक

News Desk

शिवसेना नेते रवींद्र वायकरांची भाजपा नेते किरीट सोमय्यांना मानहानीची नोटीस

News Desk