HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान

मुंबई । पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी (२१ मार्च) समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली.

दहा पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली तर ८ पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान करण्यात आली. ७९ पोलीस अधिकारी व जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

पोलीस अलंकरण समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी व गौरविण्यात येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

पोलीस उप आयुक्त‍ डॉ. एम सी व्ही महेश्वर रेडडी, पोलीस आयुक्त कार्यालय बृहन्मुंबई, उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण समीरसिंह द्वारकोजीराव साळवे, सहायक पोलीस निरीक्षक सोलापूर ग्रामीण मिथु नामदेव जगदाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गडचिरोली अविनाश अशोक कांबळे, पोलीस हवालदार गडचिरोली सुरपत बावजी वड्डे, पोलीस नाईक गडचिरोली वसंत बुचय्या आत्राम, पोलीस शिपाई, गडचिरोली आशिष मारुती हलामी , पोलीस शिपाई गडचिरोली विनोद चैतराम राऊत पोलीस शिपाई गडचिरोली नंदकुमार उत्तेश्वर आग्रे व पोलीस शिपाई गडचिरोली हामित विनोद डोंगरे यांना पोलीस शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात आले.

सहायक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त) रामचंद्र शिवाजी जाधव, सहायक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त) राजाराम रामराव पाटील, सहायक पोलीस आयुक्त मिलींद भिकाजी खेटले, सहायक समादेशक हरिश्चंद्र गोपाळ काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) मारुती कल्लाप्पा सूर्यवंशी, अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, अपर पोलीस महासंचालक व प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग मंत्रालय, मुंबई संजय सक्सेना, सहायक पोलीस उप निरीक्षक वसंत रामचंद्र साबळे (सेवानिवृत्त) यांना उल्लेखनिय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकांनी सन्मानित करण्यात आले.

पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण विक्रम नंदकुमार देशमाने, पोलीस उप आयुक्त सुरेशकुमार सावलेराम मेंगडे, सहायक पोलीस आयुक्त नेताजी शेकुंबर भोपळे (सेवानिवृत्त),सहायक पोलीस आयुक्त किरण विष्णू पाटील (सेवानिवृत्त), सहायक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त) मुकुंद नामदेवराव हातोटे, अपर पोलीस अधीक्षक (सेवानिवृत्त) दिलीप पोपटराव बोरस्टे, पोलीस उपअधीक्षक अविनाश प्रल्हाद धर्माधिकारी, पोलीस उप अधीक्षक गोपिका शेषदास जहागिरदार, सहायक पोलीस आयुक्त बालाजी रघुनाथ सोनटक्के, पोलीस उप अधीक्षक राजेद्र लक्ष्मणराव कदम, पोलीस उप अधीक्षक रविंद्र गणपत बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश दिगंबर गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली साबिर अली, पोलीस निरीक्षक अब्दुल रौफ गनी शेख, पोलीस निरीक्षक नानासाहेब विठ्ठल मसाळ, पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) प्रकाश भिवा कदम, पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) किशोर अमृत यादव, राखीव पोलीस उप निरीक्षक रमेश दौलतराव खंडागळे (सेवानिवृत्त), पोलीस उप निरीक्षक राजेंद्र नारायण पोळ, पोलीस उप निरीक्षक अविनाश गोविंदराव सातपुते, पोलीस उप निरीक्षक मक्सूद अहमदखान पठाण, पोलीस उप निरीक्षक रघुनाथ मंगळु भरसट, पोलीस उप निरीक्षक कचरू नामदेव चव्हाण, पोलीस उप निरीक्षक अशोक सोमाजी तिडके, पोलीस उप निरीक्षक विश्वास शामराव ठाकरे, पोलीस उप निरीक्षक गोरख मानसिंग चव्हाण, पोलीस उप निरीक्षक श्रीरंग नारायण सावर्डे, गुप्तवार्ता अधिकारी प्रभाकर धोंडु पवार (सेवानिवृत्त), सहायक पोलीस उप निरीक्षक दत्ताराम तुकाराम उगलमुगले (सेवानिवृत्त), सहायक पोलीस उप निरीक्षक मनोहर लक्ष्मण चिंताल्लू, सहायक पोलीस उप निरीक्षक रामराव दासु राठोड, सहायक पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय गोरखनाथ जगताप, सहायक पोलीस उप निरीक्षक सुनिल गणपतराव हरणखेडे, सहायक पोलीस उप निरीक्षक अविनाश सुधीर मराठे, सहायक पोलीस उप निरीक्षक खामराव रामराव वानखेडे, सहायक पोलीस उप निरीक्षक नितीन भास्करराव शिवलकर, सहायक पोलीस उप निरीक्षक अंकुश सोमा राठोड, सहायक पोलीस उप निरीक्षक बाळु मच्छिंद्र भोई, सहायक पोलीस उप निरीक्षक गणेश तुकाराम गोरेगावकर, सहायक पोलीस उप महानिरीक्षक अतुल प्रल्हाद पाटील पोलीस अधीक्षक नंदकुमार त्र्यंबक ठाकुर, सहायक पोलीस आयुक्त नंदकिशोर केशवराव मोरे (सेवानिवृत्त), अपर पोलीस अधीक्षक मिलींद सुधाकर तोतरे (सेवानिवृत्त), पोलीस उपअधीक्षक स्टीवन मॅथ्युज अँन्थोनी (सेवानिवृत्त), पोलीस उपअधीक्षक संभाजी सुदाम सावंत, पोलीस अधीक्षक नंदुरबार, सहायक पोलीस आयुक्त चंद्रशेखर गोविंद सावंत, सहायक पोलीस आयुक्त मुंकुदं गोपाळ पवार, सहायक पोलीस आयुक्त इंद्रजित किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त निशीकांत हनुमंत भुजबळ, सहायक पोलीस आयुक्त मंदार वसंत धर्माधिकारी, पोलीस निरीक्षक (एटप सहायक पोलीस आयुक्त) कयोमर्झ बमन ईराणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन लक्ष्मण कब्दुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती निलिमा मुरलीधर आरज, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम केशव पातारे, पोलीस निरीक्षक किसन अर्जुन गायकवाड (सेवानिवृत्त), पोलीस निरीक्षक सुधीर दत्तराम दळवी, पोलीस निरीक्षक सुभाष नानासाहेब भुजंग, पोलीस निरीक्षक सदानंद हरिभाऊ मानकर, वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी नितिन जयवंत मालप, राखीव पोलीस उप निरीक्षक जमील इस्माईल सय्यद ( सेवानिवृत्त ), पोलीस उप निरीक्षक मधुकर मारूती चौगुले, पोलीस उप निरीक्षक राजु बळीराम अवताडे, पोलीस उप निरीक्षक महेबूबअली जियाउद्यीन सैयद, पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत भगवान पाटील, पोलीस उप निरीक्षक रमेश पांडुरंग शिंगटे, पोलीस उप निरीक्षक बत्तुलाल रामलोटण पांडे, गुप्तवार्ता अधिकारी शशिकांत सोनबा लोखंडे, गुप्तवार्ता अधिकारी बाबुराव दौलत बिऱ्हाडे, सहायक पोलीस उप निरीक्षक अशपाक अलि बकरअली चिष्टिया, सहायक पोलीस उप निरीक्षक भानुदास जग्गनाथ जाधव ( सेवानिवृत्त ), सहायक पोलीस उप निरीक्षक भिकन गोविंदा सोनार ( सेवानिवृत्त ), सहायक पोलीस उप निरीक्षक वसंत निवृत्ती तरटे, सहायक पोलीस उप निरीक्षक रवींद्र यलगोंडा नुल्ले, सहायक पोलीस उप निरीक्षक साहेबराव सवाईराम राठोड, सहायक पोलीस उप निरीक्षक दशरथ बाबुराव चिंचकर, सहायक पोलीस उप निरीक्षक विष्णू रातनगीर गोसावी, सहायक पोलीस उप निरीक्षक प्रदिप हरिश्चंद्र जांभळे, सहायक पोलीस उप निरीक्षक संजय राजाराम वायचळे, सहायक पोलीस उप निरीक्षक लक्ष्मण संभाजी टेंभूर्णे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकांनी सन्मानित करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिजित बिचूकलेंना पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत चक्क १०० च्या वर पडली मतं!

News Desk

अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

Aprna

नवमतदारांनो ! मतदानाला जाताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या…

News Desk