HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

राज्यपाल कोश्यारींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (२२ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडविण्याची सूचना केली आहे. त्याचप्रमाणे, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पदवी प्रदान करणे योग्य होणार नाही, असेही मत राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या या पत्रात व्यक्त केले आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी १९ मे रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली होती. “अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा विद्यापीठांना घेणे कठीण जात आहे. कोरोनामूळे सर्व निकषांचे पालन करत ८-१० लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे कठीण होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांचा विचार करता अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ग्रेड प्रदान करण्यात यावी. तसेच या पर्यायाला मान्यता द्यावी” अशी मागणी उदय सामंत यांनी पत्राद्वारे आयोगाकडे केली होती.

Related posts

कोरोनासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातदारांवर कडक कारवाई करणार

rasika shinde

…तर मी मुख्यमंत्र्यांचे नागपूर घेईन !

News Desk

खासगी बसेस, टँकर, टेम्पो, स्कूल बस यांचा देशव्यापी संपात सहभाग

News Desk