HW News Marathi
महाराष्ट्र

‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा तीन दिवसीय पुणे दौरा,’सिंहगड किल्ल्याला भेट देत किल्ल्याची करणार पाहणी!

पुणे। मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 3 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यपाल कोश्यारी यांचा 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट असा तीन दिवसीय पुणे दौरा असणार आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनी राज्यपाल कोश्यारी यंदा पुण्यात झेंडावंदन करणार आहेत. त्याचबरोबर पुण्याजवळील सिंहगड किल्ल्याला भेट देत ते किल्ल्याची पाहणी करणार आहेत. तसंच लोणावल्यातील महावितरण कार्यालयालाही ते भेट देणार असल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या मराठवाडा दौऱ्यावरुन चांगलाच वाद पेटला होता. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनीही महाविकास आघाडीतील नेत्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. मी संविधानाने दिलेल्या घटनेनुसारच काम करतोय आणि कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं राज्यपालांनी म्हटलं होतं. राज्यपाल कोश्यारी यांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान बैठक नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली, असं राज्यपाल म्हणाले. मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन मंडळांचं काम करतोय, असं राज्यपालांनी स्पष्ट केलं होतं. जेवढी मदत करता येईल तेवढी मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रित केली जाणार असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी म्हटलं होतं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“RSS चं प्रशिक्षण घेणारे अधिवेशनात ब्ल्यू फिल्म्स पाहतात, शिकण्यासारखं काय?”, बड्या नेत्याची टीका

News Desk

तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचं स्वागतच करावं लागेल !

News Desk

भाजपच्या कोअर कमिटीला अमित शाहांचे मार्गदर्शन

News Desk