HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांकडून तळीये गावची पाहणी, मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन

महाड | राज्यातील पावसामुळे अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूरात पुराने लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार गेले होते. तसेच, विरोधी पक्ष नेत्यांनीही या भागाची पाहणी केली होती. यांच्यानंतर आता राज्यपालांनी नंबर लावला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (२७ जुलै) तळीये येथे झालेल्या दुर्घनाग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच, यात मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजलीही वाहिली. इतकंच नाही तर, केंद्राकडून मदत मिळवून देऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

डोंगरकडा कोसळून उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावातील स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज तळीये गावाद दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.राज्यपाल कोश्यारी हेलिॉप्टरने मुंबईवरुन महाडला गेले आणि तिथून रस्ते मार्गानं ते तळीये गावात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलारही उपस्थित होते.तळीये गावात पोहोचल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि अन्य अधिकाऱ्यांनी राज्यपालांना घटनेची माहिती दिली.

राज्यपालांनीही घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तळीयेतील नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. त्यावेळी बोलताना मृतांच्या नातेवाईकांच्या आणि गावातील अन्य नागरिकांच्या पुनर्वसनासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करेल. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं राज्यपालांनी सांगितलं.तळीये गावाची पाहणी केल्यानंतर राज्यपाल शेलार यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी चिपळूण आणि खेड तालुक्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही शहर आणि तालुक्यात झालेल्या हानीबद्दल सादरीकरण केलं.

राज्यपालांनी केंद्राकडून राज्याला मदत मिळवून द्यावी, शरद पवारांची मागणी

राज्यात १६ हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना १६हजार किट्सचं वाटप केलं जाणार आहे. तसेच त्यांना औषधे आणि लहान मुलांसाठी बिस्किटेही पाठवली जाणार आहेत, असं. येत्या दोन ते तीन दिवसात ही मदत पुरवली जाणार आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या सर्व साहित्याची किंमत अडीच कोटी आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. आज (२७ जुलै) शरद पवारांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी केंद्राकडून राज्याला मदत मिळवून देतील, असं विधानही पवारांनी केलं आहे.

राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. राज्याला पूराचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालं. सहा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं. शेतीचं सर्वाधिक नुकसान झालं. माती वाहून गेली. मात्र, सहा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याने मदत करण्याची गरज आहे. राज्य सरकारने काही मदत काल जाहीर केली, असं शरद पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला आरोपी आणि सह आरोपी बनवता येईल असे प्रश्न विचारले! – देवेंद्र फडणवीस

Aprna

वारकरी चिडले, उध्दव ठाकरे आणि अजित पवारांनी आता परिणाम भोगायला तयार राहा!

News Desk

उद्धव ठाकरेंचे पाय हवेत होते ते जमिनीवर आले, आनंद आहे!

News Desk