HW News Marathi
महाराष्ट्र

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालास उशिर होण्याची शक्यता

मुंबई | राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा हा सामना असणार आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार या निवडणुकीच्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. दरम्यान, या निवडणुकीचे निकाल हाती येणास मध्यरात्र होण्याची शक्यता आहे. तर निकालाचा पहिला कल दुपारी 2 नंतर हाती येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघ

नागपूर पदवीधर मतदारसंघात एकूण १ लाख ३२ हजार ९२३ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. त्यानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघात ६४.३८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या मतदारसंघाच्या मतमोजणीला आज (३ डिसेंबर) सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. नागपूर विभागीय क्रीडा संकुलात ४ हॉलमध्ये एकूण २८ टेबलवर मतमोजणी सुरु करण्यात आली आहे. टेबलवर काऊंटिंग सुपरवायजर म्हणून एक उपविभागीय किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी देण्यात आला आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली आहे. यात प्रत्यक्ष बॅलेट पेपर मोजण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी एकूण ५६ टेबल मांडण्यात आले आहेत.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा पहिला कल हाती येण्यास संध्याकाळचे 6 वाजण्याची शक्यता आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत वैध आणि अवैध मतं बाजूला करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यामुळे संध्याकाळी पहिला कल हाती येईल आणि मतदारसंघाचा निकाल हाती येण्यास आणखी वेळ जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघ

अमरावती शिक्षक मतदारसंघात ५ जिल्ह्यात एकूण ८६.७३ टक्के मतदान झालं आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणं आणि त्यांची सरमिसळ केली जाणार आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात दोन कक्षात १४ टेबलवर मतमोजणी होत आहे. २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक टेबलवर ४० गठ्ठे करण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण होईल. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण झाला नाही तर आवश्यकतेनुसार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पसंतीची मतं मोजण्यात येणार आहे. त्यामुळे निकाल हाती येण्यास उशीर होऊ शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानधनवाढ होऊनही संप सुरु ठेवणे चुकीचे -मंत्री पंकजा मुंडे

News Desk

समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा महापालिकेचा दावा मात्र उद्या होणार फैसला…

News Desk

“…अन्य मंडळांचं देखील विलीनीकरण करावं लागेल!” – शरद पवार

News Desk