सातारा | आज राज्यात ग्रामपंचायत निवडणूक झाली त्याचा आज निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे.विधानसभेच्या प्रतिष्ठित कराड उत्तर मतदारसंघातील पहिला ग्रामपंचायत निकाल आज (१८ जानेवारी) हाती आला आहे. निगडी गावात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय झालाय. ८ विरुद्ध १ अशा मोठ्या फरकानं बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे. त्यामुळे कराड उत्तरमधील निगडी गावात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे कराड तालुक्यातील पहिला निकाल खुबी या गावचा लागला आहे. खुबी गावात भाजपचे अतुल भोसले यांच्या पॅनले दणदणीत विजय मिळवला आहे. अतुल भोसले यांच्या पॅनलनं विरोधकांचा ९ विरुद्ध ० अशा मोठ्या फरकानं दारुण पराभव केला आहे.
अहमदनगरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
अहमनगर जिल्ह्यातील एकूण 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यातील 53 ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पण, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा विचार केला तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा
निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
एकूण प्रभाग- 46,921
एकूण जागा- 1,25,709
प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880