HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

ग्रामपंचायत निवडणूक: बिनविरोध निवडणुकीत शिवसेनेनं मारली बाजी

कोल्हापूर | राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणीला आज (१८ जानेवारी) सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये काही निवडणुका बिनविरोध झाल्या असून शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी सरकार आणि भाजपसाठी महत्वाची आहे.

 

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक अनेक ठिकाणी बिनविरोध झाली आहे. त्याची आकडेवारी आता समोर आली आहे. जवळपास १४१० जागा या बिनविरोध झाल्या. यात स्थानिक पातळीवर आघाड्यांकडे सर्वाधिक ५२५ जागा आहे. तर राजकीय पक्षांमध्ये शिवसेनेकडे सर्वाधिक २७८ जागा आहे. सेनेनं भाजपला मागे टाकत मान पटकावला आहे.

भाजपने २५९ जागा पटकावल्या आहे. तर राष्ट्रवादीने २१८ जागा पटकावल्या आहे. काँग्रेसने १२५ जागा जिंकल्या आहे. तर मनसेला सुद्धा खाते उघडता आले आहे. मनसेनं ५ ठिकाणी आपला बिनविरोध झेंडा फडकावला आहे. पहिला निकाल हाती आला असून कराड ग्रामपंचायतीमध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचं पॅनेल विजयी झालं आहे.

Related posts

सरकार अस्थिर होईल आणि आम्ही ‘पुन्हा प्रयत्न करूं’चा प्रयत्न फसला…

News Desk

केंद्राच्या कृषी कायद्याबाबत आज मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार

News Desk

बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

News Desk