मुंबई | महाराष्ट्र कोरोनाचे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात मुंबई आणि पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईमधील वरळी हे कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. या वरळीमधील ९० वर्षावरील आजींनी कोरोनावर मात केली आहे. या आजीबाईंचा व्हिडिओ राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केला आहे.
So the Worli model is a story of hope! This inspiration is a lady 90 years + and now covid negative! She fought covid and now has returned home! This is what we are. Humanity is about rising by inspiring others! https://t.co/QQtMle1gCe
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 27, 2020
अदित्या ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, “वरळी मॉडेल हे आशादायी वाटणार आहे. ९० वर्षावरील महिला या कोरोना चाचणी निगेटिव्ह आला आहे. या ९० वर्षावरील महिलांनी कोरोनाची लढा देऊन घर परतल्या आहेत. आपल्याला हेच दाखवायंचे आहे. इतरांना प्रेरणा देऊन माणुसकी वाढवा.”
(1/2) “Tough Times Never Last but Tough People do”. Here are the pictures which proved the saying, as 151 Covid positive persons from @mybmcWardGS jurisdiction got discharged, till date, from various hospitals. @mybmc #StayHome #WewillWorkForYou pic.twitter.com/DgudfnVai3
— WARD GS BMC (@mybmcWardGS) April 26, 2020
गेल्या काही दिवसात वरळीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. जी दक्षिणमध्ये २५ एप्रिलपर्यंत सहाशे जणांना कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने याच भागातील सर्वाधिक रुग्ण बरेही झाले आहेत. आतापर्यंत ‘जी दक्षिण’मधील १५१ पेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.