नवी दिल्ली | कांदा निर्यातदारांसाठी केंद्र सरकारने एक चांगली बातमी दिली आहे. केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवरील अनुदान ५ टक्क्यांवरुन १० टक्के करण्यात आला आहे.
Central Government today increased the export incentives granted for onions under the Merchandise Exports from India Scheme (MEIS) from existing 5% to 10%.
— ANI (@ANI) December 28, 2018
गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. शेतकऱ्यांना प्रति किलो कांद्यामागे अवघे १ ते २ रुपये इतकाच दर मिळत होता. काहीच दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल कांद्यामागे २०० रुपये इतके अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते.
नाशिकच्या संजय साठे यांनी तब्बल ७५० किलो कांदा विकून कमविलेले एकूण १ हजार ६४ रुपये पंतप्रधान मोदींना पाठविले होते. त्यानंतर पीएमओकडून देखील याची दखल घेतली गेली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.