HW News Marathi
महाराष्ट्र

गुढीपाडव्यासाठी सरकारची नवी नियमावली जाहीर, जाणून घ्या…

मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले असून लवकरच लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. आज (१३ एप्रिल) साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. यात कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मराठी नवीन वर्षाचे स्वागत आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने केले जाणार आहे. पण, यंदाच्या वर्षीही गुढीपाडवा हा घरातच साजरा करावा लागणार आहे. गेल्या वर्षी राज्यात कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन आजपर्यंत झालेले सण/उत्सव हे अत्यंत साध्या पद्धतीने लोकांनी एकत्र न जमता साजरे केले आहेत.

काय आहे नियमावली?

फेरी, बाईक रॅली मिरवणुका काढण्यात येऊ नयेत तसंच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये.

सार्वजनिक ठिकाणी एकापेक्षा ५ लोकांनी एकत्र न येता सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे

घरगुती गुढी उभारुन हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा, असे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांच्या विधानाने चाकणकरांच्या आशा पल्लवीत !

News Desk

उदयनराजेंनी राजीनामा देऊन तेथील लोकांना त्रास देऊ नये !

News Desk

पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटी तातडीची मदत जाहीर!

News Desk