चंदिगड | काँग्रेस प्रदेश प्रवक्ता विकास चौधरी यांची काही अज्ञातांनी फरिदाबादमध्ये दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. चौधरी यांच्यावर सेक्टर-९ मध्ये हल्ला झाला. हल्लेखोरांनी चौधरी यांच्यावर ५-६ गोळ्या झाडल्या. चौधरी यांना सर्वोदय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Haryana: Congress leader Vikas Chaudhary who was shot at in Faridabad and later succumbed to injuries. pic.twitter.com/k9P1nipmMy
— ANI (@ANI) June 27, 2019
भरदिवसा झालेल्या हत्येमुळे फरिदाबादमध्ये एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून विकास यांच्यावर दोघांनी हल्ला केल्याची माहिती पोलीस दलांनी दिली आहे. विकास त्यांच्या गाडीतून आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास जिमला जात असताना हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. सध्या पोलिसांकडून घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हींचे फुटेज तपासले जात आहे. तेव्हाच हल्लेखोरांनी जोरदार गोळीबार सुरू केला. यामध्ये चौधरी गंभीर जखमी झाले
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.