HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांतदादांना हिमालयामध्ये जावे लागणार नाही… हसन मुश्रीफ यांनी सांगितले कारण!

कोल्हापूर | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात कालपासून वाद सुरू आहे.आमदारकीच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी आपण कोल्हापुरमध्ये निवडणुक लढवली आणि हरलो तर थेट हिमालयात जाऊ अस म्हटलं त्यावर आता चंद्रकांतदादा पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही व ते कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती असं हसन मुश्रीफ म्हणालेत. इतकचं नाही तर चंद्रकांतदादांनी राज्यपाल नियुक्त विधानसभेच्या बारा जागासंदर्भातील माझ्या वक्तव्याला पुष्टीच दिली आहे,असही मुश्रीफ म्हणाले.

तसेच, विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झालेले आहे, विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. भाजपचा एकही आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आलेला नाही, त्यामुळे राजीनामा कोण देणार ? कशासाठी? हे होणार नाही, हे त्यांना माहित आहे. तसेच ज्या कोथरुडमधून आपण आमच्या पत्नी मेघा कुलकर्णी यांना डावलून निवडून आला आहात, तिथे भाजप पक्षही परवानगी कशी देईल? दोन्हींही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळे दादांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हांला तुमची येथेच गरज आहे असे म्हणत चंद्रकांत पाटलांच्या हिमालयात निघून जाण्याच्या वक्तव्यावर हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे.

तसेच, मी दादांचे मनापासून आभार मानतो, कारण सन्माननीय राज्यपाल व सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यामधील चर्चेबाबत वारणेवर दादा यांनी जे वक्तव्य केले होते. त्याचा स्पष्ट इन्कार त्यांनी केलेला नाही. दुपारी १२ वा. माझी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पुण्यामध्ये दादांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, राज्यपालांना संविधानातील अधिकार आहेत ते तसे करू शकतात. म्हणजे, त्यांच्या त्या वक्तव्याची त्यांनी पुष्टीच केली आहे.

तसेच, त्यांनी माझे विधान हास्यास्पद आहे, असे दादांनी वक्तव्य केले . त्याबद्दल त्यांनी असे विधान आपण स्वतः केलेले नाही, मुश्रीफ खोटे बोलत आहेत किंवा त्या भागातील जागृत देवस्थान श्री. जोतिबाची शपथ घेतो, असे काहीही म्हटलेले नाही. एकूणच काय, तर माझ्या वक्तव्याला चंद्रकांत दादानी पुष्टी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे मुश्रीफ म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

हसन मुश्रीफ यांनी केलेले वक्तव्य हास्यास्पद आहे. लोकांची करमणूक करण्यासाठी हे सुरू आहे. माझी दृष्टी अजूनही स्ट्राँग आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यास वंचितचा विरोध, प्रकाश आंबेडकरानी घेतली राज्यपालांची भेट

News Desk

“राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणारच,” अनिल देसाई यांची माहिती

Aprna

राज्यात कोरोना बाधितांची संख्या २८०१, आज ११७ नव्या रुग्णांची नोंद

News Desk