HW News Marathi
महाराष्ट्र

दारुड्यांचा हल्ल्यात जखमी झालेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णींची चौकशी केल्याबद्दल सर्वांचे मानले आभार

पुणे। कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दारू पित बसलेल्या टोळक्याला हटकल्याने झालेल्या वादातून जखमी झाल्या आहेत. यानंतर सर्व समाजातील घटकांनी, नागरिकांनी विविध पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांनी, मला भेटून आणि फोनवरून आत्मियतेने चौकशी केल्याबद्दल सर्वांचे मेधा कुलकर्णी यांनी ट्वीट करत सर्वांचे आभार मानले आहे. मेधा कुलकर्णी पुढे म्हणले, भरकटलेल्या तरुणांना दारू व अन्य व्यसनांपासून दूर करून सन्मार्गाला लावल्यासाठी या पुढेही माझे प्रयत्न चालू राहतील, असेही त्या म्हटल्या आहे.

मेधा कुलकर्णी यांना शनिवारी (६ जून) संध्याकाळी हा प्रकार कोथरूड परिसरात घडला. कोथरूड येथील सहजानंद सोसायटीच्या प्रवेशद्वारावर काही तरुण दारू पित बसले होते. या टोळक्याला येथे बसू नका म्हणत हटकले. दारूच्या नशेत असलेले हे टोळके काही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यांनी सर्वांना धक्काबुक्की करत बघून घेऊ अशी धमकी देखील यावेळी दिली. या दरम्यान झालेल्या झटापटीत मेधा कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ जखम झाली. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

काय आहे प्रकरण?

काल संध्याकाळी कोथरूड येथील सहजानंद सोसायटीच्या प्रवेशद्वारावर काही तरुण दारू पित बसले होते. यावेळी सोसायटीतील एक नागरिक कुत्रा बाहेर निघून निघाले होते. त्यांनी या टोळक्याला येथे बसू नका म्हणत हटकले. त्यानंतर या टोळक्याने संबंधित नागरिकासोबत कुत्रा अंगावर सोडतो का म्हणत वाद घातला. त्यामुळे घाबरलेला हा नागरिक पुढे निघाला असता त्यातील एकाने त्यांच्या दिशेने बाटली फेकून मारली. यावेळी दोन तरुण भांडण सोडविण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही या टोळक्याने मारहाण केली.

गोंधळ सुरू असलेल्या ठिकाणी माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि सोसायटीतील इतर नागरिकही पोहोचले. परंतु दारूच्या नशेत असलेले हे टोळके काही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यांनी सर्वांना धक्काबुक्की करत बघून घेऊ अशी धमकी देखील यावेळी दिली. या दरम्यान झालेल्या झटापटीत मेधा कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ जखम झाली. एका महिलेने याप्रकरणी तक्रार दिली असून कोथरूड पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली.

घडलेल्या प्रकारावर बोलताना त्या म्हणाल्या, कोथरूड परिसरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमधून स्पष्ट होते. मारामारी, छेडछाड, किरकोळ कारणावरून गाड्यांची तोडफोड अशा घटना या परिसरात नित्याच्या झाल्या आहेत. आजच्या घटनेतही आरोपी पळून जात असताना पोलीस काहीच करू शकले नाही. पोलीस समोर उभे असताना संबंधित तरुण अश्लील भाषेत शिवीगाळ करीत होते. यावरून त्यांना कुठलेच भय नसल्याचे स्पष्ट होते. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

संबंधित बातम्या

कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींवर दारुड्यांचा हल्ला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना संकटातही राज्याची आर्थिक प्रगती समाधानकारक! – नाना पटोले

News Desk

शुन्याचे शंभर कसे होतील याची धमक आपण ठेवली आहे – जयंत पाटील

News Desk

मराठा समाजाला नाराजी व्यक्त करण्याची मुभा द्यावी, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk