मुंबई | राज्यात आज (१८ एप्रिल) ३२८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच, आज ३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. दरम्यान, सध्या कोरोनाचा राज्यातला आकडा हा ३६४८ वर पोहोचला असून आत्तापर्यंत ३६५ रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरुप घरी गेल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
#कोरोना बाधित ३६५रुग्ण बरे होऊन घरी*
*राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३६४८*
*राज्यात ३२८ नवीन रुग्णांचे निदान*
-*आरोग्यमंत्री राजेश टोपे*
मुंबई, दि. १८ : आज राज्यात कोरोनाबाधीत ३२८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. आज दिवसभरात ३४ रुग्णांना घरी— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) April 18, 2020
सद्य स्थितीला राज्यात ३०७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ हजार ४६८ नमुन्यांपैकी ६३ हजार ४७६ जणांचे कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३६४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ८२ हजार २९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.