मुंबई। राज्यात आज ४ हजार ८४१ सर्वाधिक विक्रमी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता दीड लाखांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता १ लाख ४७ हजार ७४१ अशी झाली आहे. आज ३ हजार ६६१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या ६३ हजार ३४३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात १९२कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६ हजार ९३१ लोकांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी (२५ जून) दिली आहे.
राज्यात आज 4841कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 147741 अशी झाली आहे. आज नवीन 3661 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 77453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 63342 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 25, 2020
राज्यात ५ लाख ५६ हजार ४२८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कोरोनाबाध राज्यात आज १९२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६९ टक्के एवढा आहे.
मागील ४८ तासात झालेले १०९ मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१,मीरा-भाईंदर मनपा-१,वसई-विरार मनपा-२,रायगड-१ जळगाव मनपा-१, जळगाव-४, नंदूरबार-१, पुणे-१, पुणे मनपा-१६, पिंपरी-चिंचवड मनपा-४, सातारा-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-८, अकोला-१, अकोला मनपा-१, बुलढाणा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील असून इतर राज्यातील २ मृत्यूंचा समावेश आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.